Tuesday, August 27, 2013

गणेशोत्सव मंडळासाठी स्वस्तात वीज


सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक इंधन अधिभार असे वीजदर आहेत. हा दर घरगुती वीजदरापेक्षाही कमी आहे.

गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीजदरापेक्षा कमी दरात वीज कशासाठी?

स्वस्तात वीज घेऊन कसली समाजसेवा केली जाणार आहे?

या स्वस्तातल्या वीजेचा वापर रस्त्यात लाउडस्पीकर लावण्यासाठी, दिव्यांचा अनावश्यक झगमगाट करण्यासाठीच केला जाणार ना?

मग वीजटंचाईवर आणि वीज दरवाढीवर टीका करणारा कॉमन मॅन ‘या’ निर्णयावर गप्प का???

Wednesday, August 14, 2013

Vidhaan Presentation at Maharashtra Mandal School


Vidhaan Green Ganesh Presentation at Maharashtra Mandal School, Gultekdi, Pune.

Saturday, August 10, 2013

Green Ganesh at SSPMS Pune


Campaign to create awareness among school-children regarding effects of festival celebration and immersion of idols on our environment. And proposed solutions to control pollution of air, water, noise, etc.

Thursday, August 8, 2013

मिरजेत गणेशोत्सव होणार डॉल्बीशिवाय

मिरजेत गणेशोत्सव होणार डॉल्बीशिवाय

पुढारी, सांगली | ८ ऑगस्ट २०१३

यावर्षी गणेशोत्सव डॉल्बी शिवाय साजरा करण्याचा निर्णय डॉल्बी मालकांच्या बैठकीत घेण्यात आला. शहर पोलिस ठाण्यात आज ही बैठक घेण्यात आली. डॉल्बी संघटनेचे अध्यक्ष आण्णा सव्वाशे यांनी मिरजेमधील डॉल्बी मालक गणेशोत्सवात डॉल्बी वाजवणार नाहीत. तसेच शहराबाहेरील कोणी डॉल्बी आणल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असे सांगितले.

Sunday, August 4, 2013

वाजवा रे वाजवा...

(Click on image to read)
'वाजवा रे वाजवा' आता पाच दिवस
सकाळ पुणे, रविवार, ४ ऑगस्ट २०१३

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी चार दिवस परवानगी देण्याचा आदेश राज्य सरकारने शनिवारी प्रसिद्ध केला. त्यात दोन वैकल्पिक दिवसांतील एक दिवस जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविल्यास उत्सवाला देता येणार आहे. त्यामुळे ध्वनिक्षेपक रात्री बारा वाजेपर्यंत सध्याच्या चारऐवजी सलग पाच दिवस सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गणेश मंडळांना दिलासा मिळणार असून, भाविकांना उत्सवातील रंगत अनुभवता येणार आहे. गेल्या वर्षी पाचवा दिवस व गौरी विसर्जन एकाच दिवशी आल्यामुळे ध्वनिक्षेपकाचा वापर रात्री बारा वाजेपर्यंत करण्याची सवलत गणेश मंडळांना दोनच दिवस मिळाली होती. या पार्श्‍वभूमीवर ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यासाठी पाच दिवस परवानगी देण्यात यावी, यासाठी आमदार मोहन जोशी यांनी पाठपुरावा केला होता.

उत्सवाचा आनंद लुटण्याचा हा एकमेव मार्ग आहे का???