Sunday, August 4, 2013

वाजवा रे वाजवा...

(Click on image to read)
'वाजवा रे वाजवा' आता पाच दिवस
सकाळ पुणे, रविवार, ४ ऑगस्ट २०१३

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी चार दिवस परवानगी देण्याचा आदेश राज्य सरकारने शनिवारी प्रसिद्ध केला. त्यात दोन वैकल्पिक दिवसांतील एक दिवस जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविल्यास उत्सवाला देता येणार आहे. त्यामुळे ध्वनिक्षेपक रात्री बारा वाजेपर्यंत सध्याच्या चारऐवजी सलग पाच दिवस सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गणेश मंडळांना दिलासा मिळणार असून, भाविकांना उत्सवातील रंगत अनुभवता येणार आहे. गेल्या वर्षी पाचवा दिवस व गौरी विसर्जन एकाच दिवशी आल्यामुळे ध्वनिक्षेपकाचा वापर रात्री बारा वाजेपर्यंत करण्याची सवलत गणेश मंडळांना दोनच दिवस मिळाली होती. या पार्श्‍वभूमीवर ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यासाठी पाच दिवस परवानगी देण्यात यावी, यासाठी आमदार मोहन जोशी यांनी पाठपुरावा केला होता.

उत्सवाचा आनंद लुटण्याचा हा एकमेव मार्ग आहे का???

No comments:

Post a Comment